भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे विजय चौधरी यांची महाराष्ट्र “प्रदेश अध्यक्ष संघटनात्मक दौरा सहप्रमुख” पदी वर्णी

मुंबई/ दि.१४.९.२२ : भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे श्री.विजय चौधरी यांची महाराष्ट्र “प्रदेश अध्यक्ष संघटनात्मक दौरा सहप्रमुख” पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांनी ह्या अगोदरही ओबीसी मोर्चा अध्यक्ष व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राहून पदाची धुरा व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. विविध जबाबदाऱ्या घेऊन पक्ष वाढीसाठी ते कार्यरत आहेत.

मागील काळातील महाराष्ट्रभर केलेल्या संघटनात्मक प्रवासाचा दांडगा अनुभव गाठीशी असल्यामुळे पक्षाने यशस्वीरित्या ही जबाबदारी देऊन त्याचा निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास पक्षाला आहे.

त्यांच्या या नियुक्तीबाबत सौ.संगीता पाटील- कोकण संपर्क प्रमुख ओबीसी मोर्चा भाजपा यांचे राजकीय गुरू असल्यामुळे त्यांनी आपले गुरू श्री.विजय चौधरी यांच्या नियुक्तीबाबत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.

नेमणुक पत्र