प्रसिद्ध उद्योजक सिद्धार्थ यांचा मृतदेह मंगळुरच्या नेत्रावती नदीत सापडला;आत्महत्या केल्याचा संशय?

बंगलोर: ‘ कॅफे कॉफी डे’ (सी सी डी) चे संस्थापक, मालक आणि प्रसिद्ध उद्योजक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह बुधवारी मंगळुर जवळ नेत्रावती नदीकाठी सापडला. सिद्धार्थ हे सोमवार संध्याकाळ पासून बेपत्ता होते.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई असलेले सिद्धार्थ यांचा मृत्यू म्हणजे करदाहशतीचा बळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येणार नाही , असे पोलिसांनी सांगितले.