
अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण सिनेमा आज अखेर रिलीज झाला आहे. 4.19 लाखांचं अँडवान्स बुकींसह मुंबईसह देशातील थिएटर्स हाऊसफुल्ल झालेत. शाहरुखच्या चाहत्यांनी पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. मुंबईसह पुण्यातील थिएटर्सच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पठाण पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कोणताही धुडगूस घालू नये, त्याचप्रमाणे अनेक हिंदू संघटनांनी सिनेमाला विरोध केला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. मंबईच्या पीवीआर ओबेरॉय थिएटरमध्ये 6-7 पोलीस अधिकारी असून 60 टक्के ऑक्यूपेसीबरोबर पठाणचा पहिला शो सुरू झाला आहे.
पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो सुरू होताच थिएटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांचा मोठा उत्साह सुरू आहे. प्रेक्षक शाहरुखला चिअर अप करताना दिसले. मुंबईत अनेक थिएटर्समध्ये सकाळी 6 आणि 7 वाजताचे शो सुरू करण्यात आलेत. सकाळचे दोन्ही शो हाऊसफुल्ल आहे.
सिनेमात अभिनेत्री डिंपल कापाडिया भारतीय सुरक्षा व्यवस्थेची अधिकारी दाखवण्यात आली आहे. जी पठाणबरोबर काम करते. एका सीसीटीव्ह सर्विलांसमधून दीपिकाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. दुष्मनांशी लढून आलेला पठाण हेलिकॉप्टर उडवताना दिसत आहे. कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकी मौसम बिघडने वाला है, म्हणत पठाणमध्ये शाहरुखची दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाहरुख सिनेमात दुष्मनांना अरबी नाही तर हिंदींत बोल अशी धमकी देखील देताना दिसतोय.
पठाण सिनेमानं रिलीजच्या आधीच 4.19 लाखांहून अधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. पठाण सिनेमा 45-50 कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी शक्यता सिनेअभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे. पठाण हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झालाय. एकूण 5200 स्क्रिन, विदेशात 2500 स्क्रिन्ससह एकूण 7700 स्क्रिन्स वर्ल्ड वाईल्ड पठाण रिलीज झाला आहे.
सिनेमातील बेशरम रंग गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे वाद निर्माण झाला होता. गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डानं बेशरम रंग गाण्यावर आणि सिनेमातील अनेक सीन्सवर कात्री लावली होती. मात्र पठाण सिनेमात दीपिका बेशरम रंग गाण्यात स्विम सूटमध्येच दिसत आहे. शाहरुख खानबरोबर असलेला रोमँटिक सीन मात्र कट करण्यात आला आहे. ऑरेंज बिकीनीमध्ये दीपिका शाहरुख बरोबर रोमान्स करताना दिसत नाहीये.
पठाणचा ट्रेलर आल्यापासून सर्वांना सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमा बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सिनेमानं मोठ्या प्रमाणात अँडवान्स बुकींग केलं आहे. शाहरुख खान देखील सिनेमाचं दणकून प्रमोशन करताना दिसतोय. त्याचं आस्क एसआरके सेशन जोरदार सुरूच आहे तर दुसरीकडे चाहत्यांकडून शाहरुखला मात्र भन्नाट प्रश्न विचारले जात आहेत. शाहरुख देखील त्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं देताना दिसतोय. आधी मन्नत बाहेर उभ्या असलेल्या फॅनला शाहरुखनं बेडवरून उत्तर दिलं होतं. यावेळी फॅननं भन्नाट प्रश्न विचारला आहे.
शाहरुख खान सध्या दणकून पठाण सिनेमाचं प्रमोशन करतोय. अशात तो ट्विटरवर सर्वाधिक सक्रीय असल्याचं दिसत आहे. ट्विटवर तो सर्वांना रिप्लाय देताना दिसतोय. यानं तो चाहत्यांच्या आणखी जवळ आला आहे. पठाण सिनेमासाठी संपूर्ण थिएटर बुक केलेल्या चाहत्यांचे देखील साहरुखनं आभार मानलेत. शाहरुखचे चाहते त्याचा सिनेमा पाहण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं यावरून समजत आहे.
शाहरुख सध्या जवळपास सगळ्याच चाहत्यांच्या ट्विटला उत्तरं देताना दिसत आहे. एका चाहत्यानं ट्विट करत म्हटलंय, ‘सर लास्ट विक माझं लग्न झालं. आधी हनिमूनला जाऊ की पठाण पाहायला?’. चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर शाहरुखनं म्हटलं, ‘बेटा एका आठवडा झाला पण अजून हनिमून केला नाहीस. आता बायकोबरोबर पठाण बघायला जा आणि नंतर हनिमून कर’. शाहरुखनं दिलेल्या या भन्नाट उत्तरानंतर अनेकांना हसू आवरलेलं नाही. अनेकांनी हे ट्विट शेअर केलं आहे.






