पदवीधर तरूणांना राज्य शासनाबरोबर काम करण्याची संधी

पदवीधर तरूणांना राज्य शासनाबरोबर काम करण्याची संधी, लगेच करा अर्ज; दरमहा रु ७५,०००/- मिळणार मानधन

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणारा मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या फेलोशिपसाठी अधिकाधिक तरूणांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप (Mahades Fellowship) कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. या कार्यक्रमाची २०१५ ते २०२० या कालावधीत यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाईट – mahades.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटची तारीख २ मार्च आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ साठी जातील.

अर्ज करण्यासाठी वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे.

६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव, असे किमान निकष आहेत

ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल.

आलेल्या अर्जांमधून ६० युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.

अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा

१. १० वी, १२ वी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादींच्या गुणपत्रिका

२. अनुभवाची प्रमाणपत्रे

३. छायाचित्र व स्वक्षारीची स्कॅन प्रत

४. पत्त्याचा पुरावा

महत्त्वाच्या तारखा

अर्जाचा कालावधी – ७ फेब्रुवारी, २०२३ ते २ मार्च, २०२३

मॉक परीक्षा – ३ मार्च, २०२३ ते ५ मार्च, २०२३

ऑनलाईन परीक्षा – ४ आणि ५ मार्च २०२३

अटी व शर्ती

१. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही.

२. या १२ महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.

३. १२ महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.

४. ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.

५. फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.

६. फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.

फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.

७. फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल.

८. फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही

९. नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.

१०. फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.

निवड प्रक्रिया

टप्पा १

भाग 1: ऑनलाइन चाचणी

भाग २ : सर्वाधिक गुणांच्या आधारे स्टेज २ साठी २१० उमेदवारांची निवड

टप्पा 2

भाग १ : निवडलेले उमेदवार निबंध अपलोड करतील

भाग २ : मुलाखत (निबंध अपलोड करणार्‍या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लागू)

भाग 3 : निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे