
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत पार्थ आणि हिमांशुने कोरले सुवर्ण पदकावर नाव
ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत १७ वर्षा खालील वयोगटात अंबरनाथ येथे राहणाऱ्या पार्थ रविंद्र चिकणे आणि हिमांशू मनोज चौधरी यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले असून एप्रिल मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे.या कामगिरीचे श्रेय पालकांनी मुलांची चिवट मेहनत व प्रशिक्षक अविनाश विश्वकर्मा यांच्या अनमोल मार्गदर्शनाला दिलेले आहे राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी २६ फेब्रुवारी रोजी अंधेरी येथे घेण्यात आलेल्या होत्या या वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू येथे दाखल झाले होते. पुणे, पालघर, पिंपरी चिंचवड, जळगाव, वर्धा, नागपूर, सातारा, मुंबई, नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणचे ४५० खेळाडू या स्पर्धेत भाग घेतला होता.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या खेळाडूंचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय स्थरावर हे खेळाडू महाराष्ट्राचा झेंडा फडकवत आपले नाव रोशन करतील ह्याच अपेक्षा सर्व अंबरनाथकर तसेच महाराष्ट्राच्या जनतेकडून व्यक्त होत आहेत.






