
मुंबई: केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी वर्गालाही कामासाठी 5 दिवसाचा आठवडा असावा ही राज्य सरकारी कर्मचाऱ्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे असे वाटते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावाचा अहवाल मागविला असून यानिर्णयावर लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही राज्य कर्मचारी वर्गाची मागणी ठाकरे सरकार पूर्ण करणार असे चित्र आहे.अनेक वर्षांपासून विविध मंत्रालय कर्मचारी संघटनांनी याबाबत आंदोलन केले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्य कर्मचारी वर्गाला 5 दिवसाचा आठवडा ही मोठी खुशखबर ठरणार आहे.






