IPL 2023: रिंकू सिंगचा डंका, कोलकत्याचा गुजरातवर अफलातून विजय.

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने (Kolkata Knight Riders) आपला दुसरा विजय नोंदवला आहे. अतितटीच्या सामन्यात रिंकू सिंह (Rinku Singh) याने खेचलेल्या 5 सिक्सच्या जोरावर कोलकाताने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केलाय. रिंकूच्या पाच सिक्सच्या समोर राशिद खानची (Rashid Khan hat-trick) हॅट्रिक फिक्की पडली. रिंकूचा पराक्रम पाहून कोलकाताच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला.

दरम्यान, मला विश्वास होता की मी ते करू शकतो. नितीश राणाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला शेवटपर्यंत फलंदाजी कर, असा सल्ला दिला होता. मी जास्त विचार करत नव्हतो, फक्त चेंडू आल्यावर माझे शॉट्स खेळत होतो. चेंडू माझ्या बॅटवर चांगला आला आणि मी त्यावर विश्वास ठेवला जो मैदानावर दिसून आला, असं रिंकू सिंहने (Rinku Singh) सामना झाल्यानंतर सांगितलं.

सामन्याचं अखेरचं षटक… संपूर्ण जबाबदारी नवख्या तरुणाच्या खांद्यावर. पाच फूट पाच इंच उंचीच्या रिंकू सिंह (Rinku Singh) याने सलग पाच चेंडूवर पाच षटकार खेचले आणि गुजरातच्या (GT vs KKR) मैदानावर एकच कल्ला सुरू झाला. कॅप्टन राणाचे पाय थांबले नाहीत. धावत मैदानात जाऊन त्याने रिंकूला कडकडून मिठी मारली. एवघ्या एका ओव्हरमध्ये रिंकू हिरो ठरलाय.

अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.