
प्रगती फौंडेशनचा उपक्रम: गृहिणी उद्योजिका व बचत गटातील महिलांना मोफत इंग्रजी संभाषण कौशल्य प्रशिक्षण
प्रगती फाउंडेशन मुंबई (रजि.) मार्फत “UDDAN” एक झेप स्वावलंबनाची या कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांना मोफत इंग्रजी संभाषण कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. या अभियानात गृहिणी, उद्योजिका व बचत गट सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोफत इंग्रजी संभाषण कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेच्या जुईनगर नवी मुंबई येथील केंद्रात राबविण्यात आला.

यशस्वीपणे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व उपस्थित महिलांनी इंग्रजी संभाषण कौशल्य प्रशिक्षण फार उपयोगी ठरत आहे असे सांगितले. तसेच प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना आता इंग्रजी भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजत असून यापैकी बहुतांश महिलांनी इंग्रजी भाषेत संवाद साधत कार्यक्रमाच्या यशाची पावती दिली.

कार्यक्रमाची संकल्पना कार्यकारी संचालक सौ सिध्दी किरण राणे यांनी राबवली आणि सहभागी महिलांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रशिक्षक श्री सुशील शिरोडकर यांनी पार पाडली.

सदर उपक्रमास SHHPBS यांचे सहकार्य लाभले. काळाची गरज ओळखून आणि स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी अशा प्रकारचे खास महिलांसाठी विशेष अभ्यासक्रम प्रगती फाउंडेशन मार्फत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील विविध ठिकाणी आयोजित करणार असल्याचं कार्यकारी संचालक सौ सिध्दी किरण राणे यांनी सांगितलं.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid038AzhPpk7w3CQXSCrpWMFT4eY5dHQzfwPnJRhgqj3J6jmZ3UHkGh8XmwEGNDdxiKGl&id=100064439659690&sfnsn=wiwspwa&mibextid=6aamW6






