कोरोनाशी लढा देण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती

मुंबई – राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा देखील अहोरात्र काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी एक आयुर्वेदिक डॉक्टरांची टास्क फोर्स तयार केली आहे. या टीममध्ये माजी महापौर शुभा राऊळ आणि इतरही आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असणार आहे. ही डॉक्टरांची टीम डॉ. तात्याराव लहाने यांच्या अंतर्गत काम करणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णांना कोण कोणते आयुर्वेदिक औषध वापरले पाहिजे आणि ती औषध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी ही टास्कफोर्स काम करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, लीलावती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता.सुरूवातील एका रुग्णावर हा प्रयोग यशस्वीही झाला होता. पण,उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.