प्रयत्न केले तर तृतीयपंथी समाज सुद्धा देशासाठी भरीव काम करू शकतात – शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड

प्रयत्न केले तर तृतीयपंथी समाज सुद्धा देशासाठी भरीव काम करू शकतात – शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड

कल्याण – लिंग भेद सोडला तर तृतीय पंथी समाज आणि सर्वसाधारण समाज या दोन्ही समाजाची सुख दुःख्ये सारखीच आहेत, तृतीय पंथीयामध्येही उच्च शिक्षीत आणि कलागुण संपन्न असलेल्यांची संख्या मोठी आहे, या समाजानेही प्रयत्न केला तर ही मंडळीही देशासाठी भरीव काम करू शकतील असे विचार शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आपला कल्याण महोत्सव २०२३ या महोत्सवात व्यक्त केले .

आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या विद्यमाने ३१ डिसेंबर पर्यंत सुरु असलेल्या आपला कल्याण महोत्सवाच्या भव्य रंगमंचावर प्रतिष्ठाणच्या विद्यमाने सर्वसामान्य समाजापासून कायम स्वरूपी वंचीत असलेल्या तृतीय पंथीयांचा शुक्रवारी सन्मान आणि सत्कार करण्यात आला . या समयी तृतीय पंथीयांची संघटना असलेल्या ग्लोबल राइटस फाऊंडेशनचे संचालक डॉ . योगा नंबियार यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना महेश गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच आपल्या संघटनेतील सदस्यांच्या केलेल्या सत्कारा प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त केली . हेच सुत्र पकडून प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी आपल्या छोटेखानी भाषणात पुढे सांगितले की, एके काळी या तृतीय पंथीयांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन नकारात्मक होता, परंतु कालांतराने आज यांनाही समाजत प्रतिष्ठा मिळू लागली आहे, त्याच मुळे आता यांच्यातही डॉक्टर, इंजिनीयर दिसत आहेत . यांच्यातही कला गुण भरपूर आहेत परंतु ते दाखविण्याची यांना संधी मिळत नाही, पुढच्या वर्षी या महोत्सवात यांनी आपली कला सादर करावी अशी विनंती त्यांनी या समयी उपस्थित असलेल्या तृतीय पंथीयांना केली . या समयी ग्लोबल राइटस फाउंडेशन च्या डॉ . योगा नंबियार याचेसह गुरु शिल्पा नानी, माधुरी नग्मा, कमलाबाई, रेणुका बंदुक, कोमल पाटील, सिद्धी जाधव, शमा शेख, माबेक वाघ, करा पंचमुख, तरुणा बिम्यान, मायसी यांचा महेश गायकवाड यांचे हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .

महोत्सवाच्या या सहाव्या दिवशी शरीर स्वास्थासाठी झिंबा हा नृत्य प्रकार सादर करण्यात आला तर बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वाद्यवृदाने सदाबहार जुनी नवीन गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले . कार्यक्रमादरम्यान महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिलीप दाखिनकर, महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष प्रशांत बोटे, सचिव प्रतिक महिले, सदस्य शिवदास गायकवाड यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला .

(आनंद गायकवाड)