श्री अविनाश महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने जुईनगर मध्ये दत्तजयंती जन्मोत्सव उत्साहात साजरा 

श्री अविनाश महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने जुईनगर मध्ये दत्तजयंती जन्मोत्सव उत्साहात साजरा

जुईनगर (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक २६ डिसेबर २०२३ रोजी जुईनगर सेक्टर २३ येथे श्री अविनाश महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री दत्त जयंती जन्मोत्सव  साजरा करण्यात आला.

दिवसभर सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. सकाळी श्री दत्त अभिषेक पूजा, श्री दत्त महायज्ञ, सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव, महाआरती आयोजन करण्यात आले होते. महाआरती झाल्यानंतर श्री अविनाश महाराजांचे समाजप्रबोधनवरील प्रवचन झाले. सायंकाळी ८ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या महाप्रसादाचा लाभ स्थानिक जुईनगरकर तसेच मुंबई,ठाणे, वसई विरार,कल्याण येथून आलेल्या हजारो भाविकांनी घेतला.या महाप्रसादासमवेत मधुर भजनाचा आस्वाद भाविकांना मिळाल्याने या सोहळ्याचा आनंद द्विगुनित झाला.

या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी हजेरी लावली. यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल अध्यक्ष गुरुनाथ मिठबावकर,अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदवडेकर, महाराष्ट्र नवनिर्मण सेना वरळी मुख्य संघटक विनायक मयेकर, महाराष्ट्र नवनिर्मण सेना जुईनगर विभाग अध्यक्ष व नवी मुंबई मराठी कामगार सेना शहर संघटक अक्षय भोसले, सीवूड विभाग अध्यक्ष व शहर कार्याध्यक्ष मनपा कामगर सेना अमोल आयवळे,नेरुळ प्रभाग अमर पाटील, ऍडव्होकेट संदीप रामकर उपविभाग अध्यक्ष राजेंद्र खाडे तसेच अनेक पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी या दत्तजयंती जन्मोत्सवाला हजेरी लावली.