
वाहन चालकांनी केंद्रसरकारच्या निर्णयाविरोधात पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्त “महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना” आक्रमक
पोलीस कर्मचारी हे संपूर्ण राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात. आज त्यांच्यामुळे सर्व जनता सुरक्षित आहे. ह्याचे काही समाजकंटकाना विसर पडला आहे. आणि त्यामुळेच केंद्रसरकारच्या वाहन चालकांविरुद्धच्या नवीन निर्णयाला विरोध करण्यासाठी वाहन चालकांनी रस्त्यावरच टोळीने येऊन पोलिसांवर बांबू ने हल्ला केला, आणि त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
ज्या समाजकंटकानी पोलिसांवर हल्ले केलेत, त्यांना कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी, असे महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना संस्थापक अध्यक्ष “राहुल दुबाले” ह्यांच्या अध्यक्षतेखली “नवी मुंबई शहर अध्यक्ष “मयूर कारंडे” ह्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.

तसेच पुन्हा जर कोणी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर, महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना ही कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरेल आणि त्या नंतर पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पळण्यासाठी रस्ता कमी पडेल असा ईशारा महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना “नवी मुंबई शहर अध्यक्ष:- मयुर कारंडे” ह्यांनी दिला.
सोबत “मुंबई संपर्क प्रमुख सिद्धेश्वर सुळे”, “उरण तालुका अध्यक्ष वैभव पवार”, “उरण तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील”, “उरण तालुका सचिव हेमंत सूर्यराव”, “उरण संपर्क प्रमुख वैभव तीलोरे”, “उरण युवा आघाडी अध्यक्ष स्वप्नील कुंभार”, “रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर वाजे”, “उत्तर रायगड अध्यक्ष अमोल लकडे”, “सचिव राजेश घाडगे” राजेश पाटेकर, मयूर जाधव, प्रसन्न पडवळ, नवनाथ नमडे, नवी मुंबई शहर सचिव प्रदीप कणसे, ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष “राहुल खैर” आणि रायगड,नवी मुंबई, उरण, ठाणे येथील सर्व पदधिकारी उपस्तिथ होते.






