
मुंबई: एचटीसीनं एक वर्षांपूर्वी भारतात डिजायर १२ आणि डिजायर १२+ लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीनं एचटीसी ‘वाइल्डफायर एक्स’चे दोन वेरियंट लाँच केले आहेत.
एचटीसी ‘वाइल्डफायर एक्स’ची भारतात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजची किंमत ९,९९९ रुपये आहे. तर, ४ जाबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १२,९९९ रुपये आहे. २२ ऑगस्टपासून ग्राहक फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करु शकणार आहेत.
बॅटरी- ३,३०० एमएएच, फोनची बॅटरी एआय टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टिव्हीटी- ४जी, वाय-फाय, ब्लूट्यूथ, जीपीएस, यूएसबी टाइप- सी उपलब्ध आहे.






