
भाजपच्या काही लोकांनी कित्येक मोठी संपत्ती जमा केली आहे, एकाही भाजपच्या नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही?, याआधी राज ठाकरे यांच्यावर चौकशी लागली, शरद पवारांवर चौकशी लागली, आता प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी लागली, मग रावसाहेब दानवे का शुद्ध घी वाले आहेत का,असा संतप्त सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
केंद्राकडून याचं राजकारण होत आहे. जो बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करण्याचा प्रकार निश्चितच होत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो, असंसुद्धा बच्चू कडू म्हणाले आहेत.






