
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर आता काश्मीरमधील तरुणांसाठी मेगा नोकरभरती सुरू करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून या जागा लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ उठवण्याचं आवाहनही मलिक यांनी केलं आहे.
येत्या सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामं करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयाच्या बैठका सुरू आहेत. राज्यात विकास व्हावा, ही सरकारची इच्छा असून त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या दोन ते तीन महिन्यात सर्व सरकारी रिक्त पदे भरण्यात येणार असून काश्मिरी जनतेने या सरकारी सेवेत दाखल व्हावे, असं आवाहनही त्यांनी केलं.






