
कसारा: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून कसाऱ्यातील जि. प. शाळा कामाडीपाडा येथील ४० शालेय विद्यार्थ्यांना आणि १९ आंगणवाडीतील मोफत शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे हे ओळखून या कामडीपाड्यात साहित्य वाटप केल्याबद्दल मुख्याध्यापक जाधव सर यांनी संस्थेचे आभार मानले. महिला व मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन लक्ष्यवेध नर्सिंग शिक्षका माधुरी पडवळ यांनी केले
या कार्यक्रमाला कसारा गावचे पोलीस पाटील अशोक करडक, मोखावणे कसारा ग्रामपंचायत पोलीस पाटील पांडुरंग भोईर, कसारा ग्रामपंचायत सदस्य सोमा कामडी, प्रशालेचे मुख्यध्यापक जाधव सर, सिद्धार्थ जाधव, सुनील भोईर, तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक पंढरी भाला यांनी तर आभार प्रशालेचे शिक्षक चंद्रकांत धानके यांनी मानले.






