अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई : अवधूत तटकरे यांनी आज दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. ते आजच शिवबंधन बांधून घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांचा शिवसेना प्रवेश झाला नाही. तटकरे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी रायगडमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली.
अवधूत यांनी स्वत: या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. ‘उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत ही चर्चा होती. पक्ष प्रवेशाबद्दल आज काहीही झालं नाही. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेईन,’ असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.