

सांगली: पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांचा घरी जाऊन आरोग्य तपासणी. ट्रम्प कार्ड प्रोडकशन (माझ्या नवऱ्याची बायको) युनिटचे कलाकार आणि सामाजिक संस्थाचे स्वयंकसेवक यांच्या मार्फत घराघरात जाऊन जीवनावश्यक वस्तू तसेच पुराग्रस्ताची तज्ञ डॉक्टर मार्फत आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. प्रगती फौंडेशनच्या डॉक्टर पॅनेलनेही यावेळी आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे होती. मराठी सिने अभिनेत्री अनिता दाते (राधिका) स्वतः उपस्थित राहून पूरग्रस्तांना दिलासा देत होती. सदर सेवा सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावात देण्यात आली.






