काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास संयुक्त राष्ट्र संघाचा नकार; पाकिस्तानला जोरदार दणका

जिनिव्हा: काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात आलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही दणका दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने हा विषय चर्चेने सोडविण्याचा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचं संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

दोन्ही देशांनी काश्मीरचा मुद्दा शांततेत आणि चर्चेने सोडवावा. दोन्ही देशांना काश्मीरवर शांततेनेच तोडगा काढावा लागेल, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा असून त्यात मध्यस्थी करण्याची तिसऱ्या पक्षाची गरज नसल्याचं भारताने यापूर्वीच ठणकावून सांगितलं आहे. त्यातच आता संयुक्त राष्ट्र संघानेही त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.