आघाडीच ठरलं ; प्रत्येकी १२५ जागा, मित्रपक्षांना ३८ जागा

पुणे: येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने या पक्षांची युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे.

येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडी करणार असून त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १२५ जागा कॉंग्रेस तर १२५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

मागची चूक आता न करता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अघाडीवर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.