UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मोफत निवासी अभ्यास केंद्र

पनवेल : टकले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. संतोष टकले यांच्या निवासस्थानी (शिरढोण, पनवेल-रायगड, महाराष्ट्र -410221{GPSC – 18.9266331, 73.1294258) येथे गुणवंत व गरजू, लायक  विद्यार्थ्यांसाठी  UPSC/MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत निवासी अभ्यास केंद्र सुरु केले आहे. 

सदर ठिकाणी  35 मुले आणि 35 मुलींची राहण्याची सोय केली आहे. सध्या 3  विद्यार्थी (Trial Period) साठी केंद्रात राहत आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांसाठी सुविधा (कमाल 3 वर्षे )

  1. राहण्याची सुविधा.
  2. मेस (विद्यार्थ्यांद्वारे संचलित).
  3. ग्रंथालय.
  4. इंटरनेट सुविधा.
  5. मार्गदर्शनपर  व्याख्याने.
  6. जुजबी मनोरंजन सुविधा .

किमान शैक्षणिक पात्रता- 12वी पास. (विशेष परिस्थितीत 10 वी पास)

स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची निवड प्रक्रिया :

1. santoshatbarc@gmail.com  या email-id वर ई-मेल द्वारे किंवा (7738984852/9967584554) या संपर्क क्रमांकांवर WhatsApp करून अभ्यासकेंद्रामध्ये निवड होण्याबाबत आपला हेतू व  तपशीलवार बायोडेटा पाठवा.

2. ‘बायोडेटा’ आणि अभ्यासकेंद्रामध्ये ‘निवड होण्याबाबत आपल्या हेतूची तपासणी करून आपणास संपर्क साधू.

3.’बायोडेटा’ च्या आधारे निवडलेले उमेदवार दूरध्वनीवरील मुलाखतीसाठी(Telephonic interview) निवडले जातील.

4.दूरध्वनीवरील मुलाखतीद्वारे निवडलेले उमेदवार लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जातील.(परीक्षेचे ठिकाण-शिरढोण, पनवेल-रायगड, -410221{GPSC – 18.9266331, 73.1294258}

  1. वर निवडलेले उमेदवार वरील पत्त्यावर 1 ते 3 महिने चाचणी कालावधी (trial period) मधून जातील. यादरम्यान उमेदवाराच्या अभ्यासाची व वर्तणुकीची पडताळणी केली जाईल.चाचणी कालावधीसाठी उमेदवारावर होणारा खर्च उमेदवाराने स्वत: करायचा आहे आणि होणारा खर्च प्रत्येक महिन्याच्या अगोदर देणेे आवश्यक आहे.

6 उमेदवाराची अंतिम निवड या 5 टप्प्यांद्वारे केली जाईल.

7.TCT(टकले चॕरीटेबल ट्रस्ट)द्वारा आयोजित मासिक परीक्षांच्या आधारावर उमेदवाराच्या मासिक  खर्चावर सवलत देण्यात येईल .

फक्त ई-मेल आणि what’s app द्वारे संपर्क साधावा ही नम्र विनंती..!

टीप -उमेदवाराला कमाईचे साधन उपलब्ध झाल्यानंतर, उमेदवाराकडून त्याच्यावर अभ्यास काळात करण्यात आलेला खर्च (बिनव्याजी) परत घेतला जाईल. इतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा चालू खर्च मासिक तत्वावर  करायचा आहे. 

आपणास हा संदेश समाजिक दृष्टीकोनातून महत्वाचा आहे असे वाटत असेल तर  कृपया share करा. निवड प्रक्रिया सुरू आहे. अधिक  तपशील आणि सत्यता तपासण्यासाठी Google वर ‘संतोष टकले’ शोधा.

संतोष टकले. (9967584554),
वरिष्ठ शास्त्रज्ञ-बीएआरसी, मुंबई