आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला, जगाने दहशतवादाविरोधातील लढाईसाठी एकत्र यायला हवे – नरेंद्र मोदी

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण

न्यूयॉर्क: राष्ट्राला नवी शक्ती आणि नवी दिशा देण्याचे काम करावे लागणार आहे. सव्वाशे वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी विश्व धर्म संसदेत जगाला एक संदेश दिला होता. सद्भावना आणि शांती हा तो संदेश होता. भारताकडून जगाला आजही हाच संदेश आहे. जर जगभरातील देश दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून वेगवेगळी झाली तर ते संयुक्त राष्ट्राच्या सिद्धांतावर अन्याय होईल. भारताने विश्व बंधुत्वाची महान परंपरेला पुढे नेण्याचे प्रयत्न केले आहेत. संपूर्ण जग यावर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करीत आहे. सत्य आणि अहिंसा हाच त्यांचा संदेश असून तो विश्वाच्या शांतीसाठी आणि प्रगतीसाठी आजही महत्त्वपूर्ण आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादावर कडाडून हल्ला चढवला.

Source: News Nation

आमचा आवाज म्हणजे जगाला दहशतवादाविरोधात जागृत करणे होय. दहशतवाद हा मानवतेसाठी आणि जगासाठी एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधातील लढाईसाठी एकत्र यायला हवे. आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.