अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर, शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद; राजीनाम्याचे कारण कळले…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या तडफा तडफी राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या आमदारकीचा राजीनामा बद्दल कारण सांगितले.

पवारांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीला ईडी च्या कार्यालयात न जाण्याच्या निर्णयाबाबत सांगितले. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ईडी कार्यालयात न जाण्याची विनंती केली . तसेच माझे नाव ईडी ने घेतल्याने अजित पवार हे अस्वस्थ झाले होते व त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सांगून हा निर्णय घेतला. परंतु राजीनामा आधी किंवा राजीनामा नंतर माझा अजित पवार यांच्याशी संपर्क झालेला नाही. राजकारणाची पातळी घसरल्याने अजित पवार यांना राजकारण पेक्षा आपला व्यवसाय बरा असे वाटते. अलीकडील राजकारण चांगलं राहिलं नाही. त्यामुळे शेती करण्याचा अजित पवारांचा कुटुंबीयांना सल्ला दिला. शिखर बँक प्रकरणामुळे अजित पवार अस्वस्थ होते.

माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या अस्वस्थतेतून अजित पवार यांचा राजीनामा; मलाही राजीनाम्याची कल्पना नाही असे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होते.