प्रगती फौंडेशन मार्फत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटून दान उत्सव साजरा

रायगड: प्रगती फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमधून आणि संस्थांमधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून दान उत्सव साजरा करण्यात आला.

हरी हर पुत्र भजन समाज आणि प्रगती फौंडेशन या दोन संस्थानी मिळून सदर दान उत्सव आठवडा साजरा केला. या आठवड्यात पनवेल, पाली, सुधागड आदी भागातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या तसेच पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. रायगड जिल्ह्यात पुरामुळे अनेक शाळांचे तसेच विध्यार्थ्याचे वह्या पुस्तके भिजून फार नुकसान झाले होते.

प्रगती फाउंडेशन मुंबई याजकडून राजिप शाळा तळई , राजिप शाळा भावषेत ठाकुरवाडी, राजिप शाळा मढालि आदिवासी वाडी, राजिप शाळा गावठेवाडी आणि अंबिका सेवा संघ या शाळेना मिळून एकूण 500 रजिस्टर वह्या 500 पेन 500 पेन्सिल आणि 500 वाटर बॉटल मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या.

प्रगती फौंडेशनच्या या दान उत्सवामुळे गरजू विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान थोड्याफार प्रमाणात भरून निघाले अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांची होती.

सदर दान उत्सव हा अध्यक्ष किरण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी व्यस्थापकीय संचालक सिद्धी राणे आणि प्रशासकीय व्यस्थापक राकेश वाणी यांनी पार पाडला. संस्थेस हरी हर पुत्र भजन समाज मंडळाचे सहकार्य लाभले.