
मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही.यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं. राज्यात सहावाजेपर्यंत सरासरी ५५.३१ टक्के ते ६० टक्के इतके मतदान झालं. दरम्यान, तुरळक घटनांचा अपवाद वगळता राज्यात शांततेत मतदान पार पडलं .
येत्या२४ ऑक्टोबर ला निकाल जाहीर होणार असून सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान सर्वच वृत्तवाहिन्या आणि संस्थानी एक्झिट पोल सर्वे मध्ये महायुतीलाच बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे.






