
मुंबई : प्रगती फौंडेशनच्या मुंबई विभागामार्फत आज कामातीपुरातील लहान मुलांना शैक्षणिक वस्तू आणि भेट वस्तू वाटप करून एक आगळी वेगळी दिवाळी साजरी केली. जवळपास पन्नास मुलांना पौष्टिक आहार पॅकेट्स, वह्या, पेन्सिल आणि वॉटर बॉटल यांचं वाटप करण्यात आले. प्रगती फौंडेशनचे प्रणय ढमाळ यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दहा स्वयंकसेवकच्या मदतीने कामाठीपुरा या रेडलाईट विभागातील गरजू आणि वंचित मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.






