
मुंबई: राज्यातील अनेक महापालिकांमधील महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला होता. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने सोडतीला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत २२ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, पनवेल, अकोला, चंद्रपूर, भिवंडी आणि जळगाव महापालिकेचं महापौरपद खुल्याप्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.
येत्या २१ नोव्हेंबरला महापौरपदाचा कार्यकाळ संपत आहे. यामुळे येत्या २२ नोव्हेंबरला मुंबईच्या नव्या महापौरांची निवड केली जाणार असल्याने ही सोडत काढण्यात आली आहे.
• औरंगाबाद- ओपन महिला
मुंबई- ओपन
• पुणे – ओपन
• नागपूर – ओपन
• ठाणे- ओपन
• नाशिक – ओपन
• नवी मुंबई – ओपन महिला
• पिंपरी चिंचवड – ओपन महिला
कल्याण डोंबिवली – ओपन
• वसई विरार- अनुसूचित जमाती
• मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
• चंद्रपूर – ओपन महिला
• अमरावती- बीसीसी
• पनवेल- ओपन महिला
• नांदेड-बीसीसी महिला
• अकोला – ओपन महिला
• भिवंडी- खुला महिला
• उल्हासनगर- ओपन
• अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)
• परभणी- अनुसूचित जाती (महिला)
• लातूर – बीसीसी सर्वसाधारण
• सांगली- ओपन
• सोलापूर-बीसीसी महिला
• कोल्हापूर-बीसीसी महिला
• धुळे – बीसीसी सर्वसाधारण
• मालेगाव – बीसीसी महिला
• जळगाव खुला महिला






