
नवी दिल्ली: आज प्रथमच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय भाष्य केले. ‘शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी आम्हाला स्वीकारार्ह नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावे,’ असे आव्हान दिले.
त्यांनी सांगितले, ‘जर आमच्या महायुतीला निवडणुकीत यश मिळालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं मोदींनी सार्वजनिक व्यासपीठावर अनेक वेळा सांगितलं. त्याचवेळी शिवसेनेने विरोध का केला नाही. आता ते नवी मागणी करू लागले, ती आम्ही मान्य करू शकत नाही.’ ते म्हणाले, ‘यापूर्वी सरकार स्थापन करण्यासाठी एवढा वेळी कोणत्याही राज्यात दिला गेला नव्हता. १८ दिवसांची मुदत दिली होती. राज्यपालांनी सर्व पक्षांना विधानसभेच्या कार्यकाळ संपल्यानंतरच बोलावंलं. शिवसेना, काँग्रेस, एनसीपी आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला. आजही जर कुठल्या पक्षाकडे संख्याबळ असेल तर तो पक्ष राज्यपालांकडे जाऊ शकतो.’






