
नवी दिल्ली: फास्टॅग’च्या वापरामुळे कोट्यवधींचे इंधन वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक डिसेंबरपासून ‘फास्टॅग’चे स्टीकर न लावलेले वाहन ‘फास्टॅग’लेनमधून गेले तर, संबंधित चालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. एक डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ स्टीकरचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. ‘
एनएचएआय’च्या दाव्यानुसार आजपावेतो ७२ लाख ‘फास्टॅग’ची विक्री करण्याकत आली आहे. मंगळवारी (२६ नोव्हेंबर) एकाच दिवशी १,३५,५८३ ‘फास्टॅग’ची विक्री झाली आहे.
टोल प्लाझांवर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे दर वर्षी १२ हजार कोटी रुपयांचे इंधन वाया जात असल्याचे दिसून आले असून, ‘फास्टॅग’च्या वापरामुळे कोट्यवधींचे इंधन वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











