नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास राष्ट्रपतींची मंजुरी, कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने रात्री उशिरा दिले. या कायद्यानुसार, भारताचे शेजारी देश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अत्यातारांचे शिकार झालेल्या नागरिकांना भारतात सुलभतेने शरण मिळणार आहे. मात्र, या कायद्यांतर्गत या शेजारी देशांमधील मुस्लीम धर्मीय नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार नाही.

राष्ट्रपतींनी काल रात्री उशिरा या विधेयकावर सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली.