
पनवेल: स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिनांक १४ डिसेंबर, 2019 रोजी “रन फॉर पुल्लूशन फ्री सिटी” तद्अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेमार्फत इन्फिनिटी फौंडेशन आणि आय एन आय एफ डी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानने आमदार प्रशांत ठाकूर जी यांच्या अध्यक्षते खाली जनजागृतीपर ” पनवेल मिनिथॉन २०१९ ” चे यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला राजेंद्र कोलकर ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले सदर कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेविका श्रीम. राजश्री वावेकर , सहायक आयुक्त श्री. शाम पोशेट्टी, स्वच्छ भारत अभियान -वरिष्ठ सल्लागार श्री म मधुप्रिया आवटे, आरोग्य निरीक्षक श्री शैलेश गायकवाड ,आरोग्य निरीक्षक श्री डौलात शिंदे व इतर महानगरपालिका अधिकारी,आय एन आय एफ चे सुरिंदर सिंग सर व उद्योजक राजेंद्र कोलकर व महाराष्ट्र बिल्डर अससोसिएशन चे लक्ष्मण साळुंखे ह्यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुमारे १३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मान्यवरांच्या भाषणाने व मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमा मध्ये पिल्लईस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पिल्लईस कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड ससान्स, एम जी एम कॉलेज,आय टी एम कॉलेज, सी की टी कॉलेज, के ल ई कॉलेचे कॉलेज,राज अकादमी, गुड मॉर्निंग क्लब आदी याने सहभाग घेतला. ६६ वर्षाचे जेष्ठ नागरिक सौ पार्वती मोरे या रन च्या प्रमुख आकर्षण ठरल्या.







