
नवी दिल्ली : नागरिकता सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act किंवा CAA) विरोधात देशभरात उसळलेल्या आगडोंबानंतरही गृहमंत्री काही मागे हटायला तयार नाहीत. कितीही विरोध झाला तरी भारतीय जनता पक्षाचं सरकार सर्व शरणार्थींना भारताचं नागरिकत्व देणारच असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय.
शरणार्थिंना नागरिकत्व मिळणारच… ते भारतीय नागरिक बनणार आणि सन्मानानं देशात राहणार. तुम्हाला जो राजकीय विरोध करायचाय तो करा परंतु, भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारनं हा दृढ संकल्प केलाय, असं अमित शहा यांनी दिल्लीत म्हटलंय.






