नटसम्राट श्रीराम लागू यांचं निधन

पुणे: नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागूयांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. श्रीराम लागू यांचं आज रात्री साडे नऊच्या सुमारास निधन झालं. त्यांचं पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. डॉ.लागू यांनी तब्बल चार दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी शंभरहून अधिक हिंदी सिनेमात आणि ४० हून अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केलं. तसेच २० हून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांनी मराठी, हिंदीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं,