2020 आयपीएल लिलाव, खेळाडू झाले मालामाल

कोलकाता: २०२० साठीच्या आयपीएलचा लिलाव अखेर संपला आहे. आयपीएलच्या या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स हा यंदाच्या मोसमातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. पॅट कमिन्सला कोलकात्याने १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. तर लेग स्पिनर पियुष चावला हा यंदाच्या मोसमातला सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू बनला. पियुष चावलाला ६.७५ कोटी रुपयांना चेन्नईने विकत घेतलं. यंदाच्या मोसमात एकूण ६२ खेळाडूंचा लिलाव झाला. 

देश-विदेशातील खेळांडूना आठ संघात बोली लावून खरेदी करण्यात आले. यात नवीन खेळाडूंवरही जबरदस्त बोली लागली. भारताचा अंडर १९ क्रिकेट संघाचा कर्णधार प्रियम गर्ग, ध्रुव चंद जुरेल, आणि यशस्वी जायस्वाल यांच्या नावाची लिलावात जोरदार चर्चा झाली. या लिलावात बोलीसाठी २० लाख (बेस प्राईस) रुपयांपासून बोलीसाठी उपलब्ध असलेल्या यशस्वी जायस्वालला राजस्थान रॉयल्सने तब्बल २.४ कोटी रुपयांना खरेदी केले. यशस्वी सध्या भारतीय अंडर १९ संघात सलामीवीर म्हणून खेळतो. तसेच तो अंडर १९ वर्ल्ड कपच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. आज यशस्वी जायस्वालवर अडीच कोटींची कोटींची बोली लागली असली तरी यशस्वीने एके काळी मुंबईतील आझाद मैदानात पाणीपुरी विकण्याचे काम केलेले आहे. स्वतःचा खर्च स्वतः करण्यासाठी यशस्वीने मुंबईतील आझाद मैदानात पाणी पुरी विकण्याचे काम सुरू केले होते.

तसेच अनेक खेळाडूवर बोली न लागल्याने ते असेच रिकामे राहिले.