
मुंबई: शिवसेनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे विक्रोळीत मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात शेखर जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीच्या टागोरनगर परिसरात हा प्रकार घडला.
चंद्रशेखर जाधव त्यांच्या मुलासह साईनाथ मंदिरात असलेल्या कार्यालयात बसले होते. त्याच वेळी अभय सिंगनं मंदिरात येऊन बेछूट गोळीबार केला. चंद्रशेखर जाधव यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले, असं प्रत्यक्षदर्शी मंदिराचे पुजारी विद्याधर शेंबेकर यांनी सांगितलं.
विक्रोळी पोलिसांनी अभयसिंगला अटक केलीय. विक्रोळीमध्ये रियल इस्टेट प्रोजेक्टची कंत्राटं मिळवण्याच्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी व्यक्त केलीय






