बॉक्स ऑफिसवर सलमानच खरा ” दबंग “

मुंबई: शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच चांगला वेग पकडला असून, कमाईचे आकडे ४९ कोटींपर्यंत पोहोचले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली.

समीक्षकांच्या संमिश्र प्रतिसादात या चित्रपटाला जवळपास ७.५ ते ९ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचं आदर्श यांनी सांगितलं. या चित्रपटाने शुक्रवारी २४.५० कोटी, शनिवारी २४.७५ कोटी रुपयांची कमाई केली. रविवारपर्यंत हे आकडे ४९.२५ कोटींवर पोहोचले, असं आदर्श यांच्या ट्विटमधे लिहिलं होतं. 

पहिल्या दोन दिवसांतच या चित्रपटाने ४९ कोटींचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता पुढच्या दोन दिवसांमध्ये हे आकडे १०० कोटींवर पोहोचतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

नवोदित अभिनेत्री सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह सहकलाकारांच्या साथीने हा सलमान प्रेक्षकांच्या भेटीला आलाय चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याविषयीच्या कमाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात होती. त्याचेच पडसाद आता कमाईच्या आकड्यांच्या चढत्या आलेखात दिसत आहेत.