
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या माटुंगा आणि माहीम स्टेशनच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने सकाळपासून धीम्या गतीची वाहतूक जवळपास वीस मिनिटे उशिराने धावत आहे. चर्चगेट वरून अंधेरीच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गाने वळविण्यात आली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला.






