
झारखंड: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राजद आघाडीने बाजी मारली. भाजपला सत्तेतून पाय उतार केले.
झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी आल्याने सत्तेतून पायउतार व्हाव्या लागणाऱ्या भाजपच्या जागाही दुपटीने घटल्या आहेत. तर काँग्रेस, जेएमएम आणि राजदला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तब्बल ४७ जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
काँग्रेसची निशाणी हाताचा पंजा असून, जेएमएमची निशाणी धनुष्यबाण आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे झारखंडमध्ये काँग्रेसने जुळत घेत झारखंड मुक्ती मोर्चा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केली. तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं सत्ताधारी भाजपविरोधात वरचढ ठरले. महाराष्ट्रात धनुष्यबाण आणि पंजा एकत्र आले आणि सत्तांतर झाले. याच नाट्याची प्रचिती झारखंडमध्येही दिसून आली आहे. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं (जेएमएम) भाजपला पराभवाची धूळ चारली.
भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान मोदी यांनी ट्विट करताना म्हटले आहे, झारखंड निवडणुकीच्या विजयासाठी हेमंत सोरेनजी, झामुमोच्या नेतृत्वाखालील युतीला आणि त्यांना राज्याची सेवा करण्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.






