बुधवारी मध्यारेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक, कल्याण – डोंबिवली लोकल राहणार बंद

मुंबई: ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर बुधवारी, २५ डिसेंबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी ९.४५ ते दु. १.४५ या काळात ४०० मेट्रिक टन वजनी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर उभारण्याचे काम करण्यात येईल. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक ५ तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण १६ मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.

२५ डिसेंबरला या मेल-एक्स्प्रेस राहणार रद्द

-(११००९-११०१० ) सीएसएमटी-पुणे सिंहगड

-(१२१२३-१२१२४) सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन

-(१२१०९-१२११०) सीएसएमटी-मनमाड पंचवटी

-(२२१०१-२२१०२) सीएसएमटी-मनमाड राज्यराणी

-(१२०७१-१२०७२) दादर-जालना जनशताब्दी

-(११०२९-११०३०) सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी

-(५११५३-५११५४) सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर