
उद्या दिनांक17 जून रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे उदया सर्व हॉस्पिटल्स आणि वैधकीय सेवा देणारे केंद्र बंद असणार आहेत. या वादाची ठिणगी पडली ती कोलकाता मध्ये.
75 वर्षीय वृद्ध रुग्णांच निधन कोलकता येथील एन आर एस हॉस्पिटलमध्ये झाले आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर्स च्या निष्काळजीपणा मुळे झाल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली व डॉक्टरांना मारहाण केली. याचा निषेध म्हणून पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरनी संप पुकारला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डॉक्टर यांच्यातील बोलणी फिस्कटली. ममता बॅनर्जी यांनी एन आर एस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी संप सुरूच ठेवल्यास कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले आणि हा वाद आणखीच चिघळला. डॉक्टरांची मागणी आहे की, दोषींवर कारवाई करावी व डॉक्टरांना पोलिस सुरक्षा मिळाली पाहिजे.
वारंवार होणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्या देशव्यापी संप जाहीर केला आहे. या संपाचा परिणाम हॉस्पिटल, सिटी स्कॅन सेंटर, विविध वैधकीय सेवा देणाऱ्या सेवा केंद्र इत्यादी वर होणार आहे.











