सिद्धीिनायक मंदिर राहणार पाच दिवस दर्शनासाठी बंद

मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान गणरायाच्या मूर्तीला ‘शेंदूर लेपन’ करण्यात येणार असल्यानं सिद्धिविनायक मंदिराचा मुख्यगाभारा बंद राहणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही. माघी गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी अशा प्रकारचं शेंदूर लेपण श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला केलं जात असतं. त्या दरम्यान गाभाऱ्यात असलेल्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात येते.

20 जानेवारीला मूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येईल, अशी माहिती न्यासातर्फे देण्यात आली आहे.