नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न

नवी मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना -जुईनगर विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक ३१|०१|२०२० रोजी आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. जुईनगर सेक्टर २३ मध्ये मनसे गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकानी मतदार नोंदणी अभियानात स्थानिक लोकांनी आपल्या नावाची नोंदणी करून अभियनास खुप छान प्रतिसाद दिला.

प्रगती फौंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक सौ सिद्धी राणे


या कार्यक्रमात स्थानिक परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध प्रकारचे खेळाचे आयोजन करण्यात आले होते. खेळ, गाणी, उखाणे अश्या अनेक प्रकारचे खेळ यावेळी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात कांग्रेस पक्ष्याच्या जूईनगर तालुका अध्यक्ष्य सौ संध्या ताई कोकाटे, समाजसेविका नीता ताई खोत , प्रगती फाऊंडडेशन च्या संचालीका सौ सिद्धी राणे,विमल फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री व सौ प्रकाश भाऊ ढसाळ,बचत गटाच्या अध्यक्ष सौ वंदणा गरजे,समाजसेविका गायकवाड ताई, समाज सेविका सौ स्नेहल ताई,महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष श्री गजानन काळे साहेब,कामगार सेनेचे शहरअध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठूले,उपशहर अध्यक्ष श्री विनोद जी पार्टे साहेब,कामगार सेनेचे सरचिटणीस श्री अभिजित देसाई साहेब,कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री अमोल ऐवले साहेब,श्री राजू खाडे,नेरुळ विभाग अध्यक्ष विनोद पाखरे,जूईनगर विभागाचे विभाग अध्यक्ष श्री अक्षय भोसले,शाखा अध्यक्ष मयुर कारंडे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहराध्यक्ष सौ धुमाळ, उपशह अध्यक्ष सौ दीपाली ढऊल,उपशहर अध्यक्ष सौ सोनिया धानके,शहर सचिव सौ यशोदा खेडस्कर,सहसचिव सौ अरुणा राठोड,सौ सायली कांबळे,विभाग अध्यक्ष शशिकला गोलिम अश्या अनेक मान्यवरांनि कार्यक्रमाला उपस्तीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. विजेत्या ठरलेल्या महिलांना मानाची पैठणी देवून सन्मानित करण्यात आले.

विविध खेळाचे आयोजन

याशिवाय महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. जूईनगर विभागअध्यक्ष सौ शितल मोरे,उपविभाग अध्यक्ष सौ विद्या इनामदार,शाखा अध्यक्ष सौ पपिया दंदोपात,शाखा अध्यक्ष सौ मनिषा नागरे,सौ दीपाली दमने,महाराष्ट्र सैनिक सौ प्रणाली तेंबे,सौ सेजल औटी,सौ मंदा चौहांन,ज्योति वाघ,सौ सुवर्णा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेवुन यशश्वीरित्या पार पाडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजित घनवट यांनी केले.

मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांची उपस्थिती

या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी मनसेच्या उपशहर अध्यक्षा सौ अनिथा नेटके नायडू यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करून कार्यक्रमाला खुप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सौ अनिथा नेटके नायडू यांनी सर्व महिलांचे आभार मानले.