नवी मुंबईत रखडलेल्या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी मनसे मार्फत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेने पाच वर्षांपूर्वी अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्याच्या कामाला सुरुवात केली होती . ऐरोली सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर २८९३.२९ क्षेत्रफळावर हे नाट्यगृह उभारले जाणार होते परंतु अद्याप येथे कोणतेही काम सुरु करण्यात आलेले नाही. सदरचे काम लवकरात लवकर सुरु करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.०० वा., ठिकाण : ऐरोली नाट्यगृहाच्या समोर, माउली संकुलच्या बाजूला, सेक्टर-४, ऐरोली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

यावेळी उपोषणातील महत्वाच्या मुद्द्यांनी नागरिक व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले.

१) या नाट्यगृहासाठी आमदार निधी देण्यात आला होता त्याचे काय झाले?

२) दिलेला कालावधी उलटून गेला तरीही सदर कंपनीवर नवी मुंबई पालिकेतर्फे कोणतीही प्रकारचा दंड का नाही आकारण्यात आला?

३) लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या नंतर काम सुरु करण्याच्या आश्वासनांचे काय झाले?

४) नाट्यगृहाचे काम कधी पर्यंत सुरु होईल याचे लेखी आश्वासन द्या?

५) सदरच्या गंभीर विषयांवर विरोधी पक्ष का म्हणून गप्प आहेत?

६) आता पर्यंत ३ जणांचे निष्पाप बळी घेतले, अजून किती जीव घेणार?

असे अनेक मुद्दे या उपोषणा दरम्यान मांडण्यात आले. तसे पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आले आहेत. तरी याबाबत पालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी अथवा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर लवकरच मनसे स्टाईल ने जण आंदोलन छेडण्यात येईल व याकरिता सर्वस्वी जबाबदार हे पालिका प्रशासन असले याची नोंद घावी.

या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणामध्ये गजानन काळे-शहर अध्यक्ष, धनंजय भोसले-सहसचिव, चंद्रकांत महाडीक-जनहित कक्ष अध्यक्ष, विश्वनाथ दळवी-विभाग अध्यक्ष, गणेश म्हात्रे-उपाध्यक्ष माथाडी सेना, कल्पेश बेलोसे-उपविभाग अध्यक्ष, दिनकर पागिरे-उपविभाग अध्यक्ष, अक्षय सावंत-शाखा अध्यक्ष, गौरव महाडिक-शाखा अध्यक्ष, आप्पासाहेब कोठुळे, अध्यक्ष कामगार सेना, भुवणेश सायगावकर व हसनैन नाकाडे उपस्थित होते.