
नवी मुंबईतील प्रगती फौंडेशनच्या कार्यकारी व्यस्थापकीय संचालक सिद्धी किरण राणे यांना शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार
नवी मुंबई: नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजानन काळे आयोजित पाच्छिम् महाराष्ट्र महोत्सव 2020 या कर्निवलमध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा छत्रपति शिवाजी महाराज यांच्या 390 व्या जयंतीनिमित्त सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवचरित्र वक्ते स्वप्निल पाटील यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांचा बालपणापासूनचा ईतिहास जिवंत केला. इतिहासातील घटनेचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आजच्या पिढीला काय घेता येईल हे सांगितले. तसेच शिवाजी महाराज हे कशा प्रकारे ज्येष्ठांचा आदर, महिलांचा सन्मान करीत असत याबद्द्ल सांगितले.
त्यानानंतर गड किल्ल्याचे ज्येष्ठ अभ्यासक आप्पा परब यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व गड किल्ल्यावर आधारित व्याख्यान झाले. यावेळी आप्पा परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास पुराव्यानिशी कसा उपलब्ध आहे आणि आधुनिक अभ्यासक कसा त्याचा तोडामोड करीत आहेत याबद्दल भाष्य केले.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार देण्याकरिता व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे तसेच पुण्यभूमीचे संपादिका मॅडम, आयोजक गजानन काळे , अनिथा नायडू आणि मनसे पदाधिकारीउपस्थित होते. शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते यशस्वी कर्तुत्ववान महिलांना जिजाऊ पुरस्कार देण्यात आला. यात सामाजिक, उद्योग, आरोग्य, शिक्षण, न्याय, पोलिस सेवा इत्यादी अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश होता.

नवी मुंबईतील प्रगती फौंडेशन यासंस्थेच्या कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक सौ. सिद्धी किरण राणे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. नवी मुंबईतील अनेक भागातील लोकांनी कार्यक्रमास गर्दी केली होती. कार्यक्रम सानपाडा येथील वीर झाशीची राणी मैदान येथे आयोजित करण्यात आला होता.






