
सिंधुदुर्ग:
कोकणचे प्रसिध्द आणि नवसासाठी पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले. भराडी देवी दर्शनानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत कक्षाला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांचा सत्कार केला.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, खा.विनायक राऊत,माजी पालकमंत्री दिपक केसरकर,आ.वैभव नाईक संदेश पारकर,अतुल रावराणे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.






