
मुंबई: खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्यांवरून अधिवेशनात विरोधकांकडून कोंडी होणार त्याआधीच ऑर्डर काढून या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दोन्ही नेत्यांच्या नियुक्त्या रद्द झाल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेचे नेते मुख्य सचिवांवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. सचिवांनी नियुक्त्या करण्याआधी या त्रूटी का कळवल्या नाहीत? असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्य सचिवांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप होत असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.






