
नवी दिल्लीः दिल्लीत सीएएवरून सलग तिसऱ्या दिवशी सुरू हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेलाय. तर जवळपास १५० जण जखमी झालेत. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिलीय. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आला आहे.
दिल्लीतील हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह १३ जण ठार झालेत. हिंसाचारात ५६ पोलिस आणि १३० नागरिक जखमी झालेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलंय. सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी सतत गस्त घालत आहेत. आजही काही भागात हिंसक घटना घडल्या, असं रंधवा म्हणाले. तर हिसांचारात १३ जण ठार झाल्याची माहिती गुरू तेग बहादूर हॉस्पिटलने दिलीय. एएनआयने हे वृत्त दिलंय.

दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लष्कराचा पाचरण करण्याची मागणी करण्यात आली. पण गृहमंत्रालयाने याला नकार दिलाय. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, असं सांगण्यात आलं. तर अमित शहा यांनी दिल्लीकर जनतेला शांततेचं आवाहन केलंय. आफवांवर विश्वास ठेवू नका, असं म्हटलंय.






