कोरोना धोका संबधित राज्यातील अनेक मंदिर दर्शनासाठी बंद: दगडूशेठ, सिद्धिविनायक आणि तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उद्यापासून पुढील आदेश होईपर्यंत भाविकांसाठी बंद महाराष्ट्रयातील पुण्याचे श्रीमंत दगडू सेठ गणपती मंदिर उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना विषाणूची सावली धार्मिक स्थळांवर देखील पडत आहे. 
सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांसाठी दगडू सेठ गणपती मंदिर बंद करण्यात आले आहे. कोरोनाची साथ सर्वत्र पसरत असल्याने हे निर्णय घेतले आहे. 

कोरोनाचा वाढता धोका पाहता पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थान ने घेतला आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने निर्णय जाहीर करताना देवीच्या धार्मिक पूजा आणि विधी हे देवीचे महंत आणि पाळीकर पुजारी हे करतील. मात्र, 4 पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानंही महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सिद्धिविनायकाचं मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीनं एक महत्वाचा निर्णय घेतला असून, करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गर्दी टाळण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. करोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलाय. रुग्णांची संख्या वाढतेय. राज्यातही रुग्णांचा आकडा वाढत आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केलं आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज येत असतात. त्यामुळं सरकारच्या आवाहनानुसार, गर्दी टाळण्यासाठी आपली जबाबदारी म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मुंबादेवीचं मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.