
मुंबई: मुंबई: लंडनमधील ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईतही ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकजवळ हे ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे. वांद्रे येथे सी लिंक सुरू होताना टोल नाक्याजवळ असलेल्या जागेवर ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे. सीआरझेड व इतर परवानग्यांबाबत अडचण निर्माण न झाल्यास याच ठिकाणी ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ‘मुंबई आय’ साकारण्यात आल्यास पर्यटकांचा ओढा मुंबईकडे वाढणार आहे. या ‘मुंबई आय’मधून संपूर्ण मुंबईचे विहंगमय दृष्य पाहण्याची संधी पर्यटक आणि मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.






