
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते ऋषिकेश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांचा अनोखा उपक्रम
औरंगाबाद : संपूर्ण जगभर Covid 19 मुळे भीतीचे वातावरण असताना महाराष्ट्रात देखील कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अमित देशमुख हे सर्व मंत्री कोरोना वायरस शी सामना करण्याकरिता महाराष्ट्रात यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष लोकांत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ताधारी आघाडीतील पक्ष खासकरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षातील काही पदाधिकारी देखील आपापल्या कार्यक्षेत्रात जन जागृती व कोरोणासाठी काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करीत आहेत.
तसेच काही राजकीय पक्ष व नेते मंडळी यांनी त्यांच्या विभागात मास्क, डेटॉल वाटप करीत आहेत. महाराष्ट्रात पुण्यातून कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. हळू हळू महाराष्ट्राच्या इतर भागातून सुद्धा कोरोनाच्या केसेस पुढे येत आहेत म्हणूनच आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे नेते ऋषिकेश देशमुख व त्यांच्या सहकार्यनी देखील औरंगाबादमध्ये अनोख्या पद्धतीने कोरोनविषयी जन जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिचयातील विवाह सोहळ्यात (वधू :- उषा व वर :- विजय शिंदे ) नवदाम्पत्याला आहेर स्वरूपात मास्क व स्यानिटेजर देऊन अनोख्या पद्धतीने वधू वरास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कोरोना व्हायरसपासून बचावासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहितीदेखील सर्वांना दिली.






